घरोघरी तिरंगा जनजागृती रॅलीस बुधोडा येथे प्रतिसाद
 औसा प्रतिनिधी
 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल आजादी का अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून बुधोडा येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये घरोघरी तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन करीत ग्रामस्थांना तिरंगा राष्ट्रध्वज व विक्रीत करण्यात आले. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत आपापल्या घरावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन करीत राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन जनजागृती रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी सरपंच अज्ञान बाई मगर, उपसरपंच कैलास पाटील, ग्रामविकास अधिकारी गिरी यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments