बी एड प्रथम वर्ष उतिर्ण झाल्याने सहकाऱ्यांनी केला महेश कांबळे सर यांचा सन्मान
औ सा- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदनगर भादा येथे शिक्षक सहकारी बांधवांनी बी एड प्रथम वर्षामध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे हृदयपूर्वक महेश पंढरीनाथ कांबळे सराचा सहकारी शिक्षक यांनी शनिवार दिनांक 6ऑगस्ट 2022 रोजी सकाळी शाळेमध्ये सन्मान केला.
यानिमित्ताने आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असताना आणि चोख शिक्षकी कर्तव्य बजावताना आपल्या अंतर मनातील जिज्ञासू विद्यार्थी गुण या वयामध्ये ही अलगत शाबूत ठेवल्याने हे यश प्राप्त झाले असून त्यांच्यासाठी हा सन्मान म्हणजे एक प्रकारे पुढील शिक्षणासाठी ऊर्जा देण्याचे काम त्यां सर्व सहकाऱ्यांनी केले.याबद्दल कांबळे सराना खूप मनस्वी आनंद वाटला!आणि आपण माझ्यापेक्षा खूप ज्ञानी अनुभवी आहात. आपण दिलेल्या शुभेच्छा या मी मनःपूर्वक स्वीकार करतो.आणि आपले आभार न मानता आपल्या ऋणातच सदैव राहणे पसंत करतो.अशा भावना त्यांनी यावेळी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
0 Comments