ओला दुष्काळ जाहीर करुन सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी: मनसेची मागणी
औसा प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात सलग दोन महिने अतिवृष्टी, संततधार पाऊस तर काही भागात ढगफुटी झाल्याने शेतातील पिकासह जमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच शंखी गोगलगायच्या प्रार्दुभावामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबिन हे नगदी पीक उध्वस्त झालेले आहे.अनेक भागातील शेतकऱ्यांना दुबार - तिबार पेरणी करुनही पिक हाती लागत नसल्याने व आर्थिक भुर्दंड सहन होत नसल्याने चहुबाजूंना नैसर्गिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.
अशा या बाधीत शेतकऱ्यांना शासनाने 13 हजार 500 रुपये ची मदत जाहीर केलेली मदतही अत्यंत तोकडी असुन राज्याच्या व केद्रांच्या विविध यंत्रणाचा सर्वे आमदार, खासदार व मंत्रीमहोदयांचे पाहणी दौरे यात शासनाने वेळ न दडवता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रुपये व बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी, व शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे, अन्यथा शेतकऱ्यांना दिलासा मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही वेळप्रसंगी सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील पीक पाहणीच्या दौऱ्यात आल्यावर मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी मनसेच्या वतीने निवेदन सादर केले आहे.यावेळी संतोष नागरगोजे, भगवान शींदे, धनराज गीरी, मुकेश देशमाने, सचिन बिराजदार, विकास लांडगे, किशोर आगलावे,महेश बनसोडे, प्रविण कठारे,गोवींद चव्हाण,अमोल थोरात,तानाजी गरड, ईश्वर परिहार,नवनाथ कुंभार,प्रशांत जोगदंड, हणमंत येनगे आदि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments