एम आय एमच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागणीचे निवेदन 
औसा प्रतिनिधी
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळचे शैक्षणिक व व्यावसायिक कर्ज योजना वाटप करून 500 कोटीची निधी उपलब्ध करून देण्यात यावी या अशा विविध मागणीसाठी औसा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री व अर्थमंत्री याना एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी दिनांक 24 आॅगस्ट बुधवार रोजी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात त्यांची विविध मागणी अशी
मौलाना आझाद महामंडळला 500 कोटी अनुदान तरतूद करण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 15 कलमी अल्पसंख्याक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी.तसेच जिल्हा नियोजन बैठकीत आढावा घेण्यात यावा.
मौलाना आझाद महामंडळची कार्यकारणी तयार करण्यात यावी व अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्यात यावे.
अल्पसंख्याक बहुल शहराचा निधी मागील 9 वर्षांपासून देण्यात आलेला नाही,तो त्वरीत देण्यात यावे.मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळच्या वतीने शैक्षणिक व बिज भांडवल,वाहन कर्ज योजनाच्या माध्यमातून थेट कर्ज वाटप करण्यात यावी. अशा विविध मागणीचे निवेदन एम आय एमच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व अर्थमंत्री याना दिले आहे.या निवेदनावर एमआयएम  औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, शेख नय्युम,अजहर कुरेशी, अँड आर एम शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments