माकणी धरणातील पाणीपुरवठा सुरू होऊन सुद्धा औसेकरांच्या घशाला कोरड
 औसा प्रतिनिधी
 औसा शहराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मागणी ते औसा 37 किलोमीटरची पाईपलाईन आणि धरणामध्ये विहीर तसेच जलशुद्धीकरण केंद्र पाण्याच्या नवीन टाक्या अशी जवळपास 45 कोटी रुपयाची योजना कार्यान्वित होऊन सुद्धा आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अवसेकरांचा घशाला कोरड पडली आहे. शहराची लोकसंख्या 45 ते 50 हजार च्या घरात गेली असून औसा शहराला मुबलक पाणीपुरवठा मिळावा म्हणून निम्नतीरणा प्रकल्पाच्या मागणी धरणातून पावसा शहरासाठी ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे पावसाळ्यात सुद्धा अवसेकरांना पंधरा दिवसातून एकदा पाणी येत असल्याने औसा शहरातील नागरिकांच्या घशाला कोरड पडल्याने शहरातील नागरिकात तीव्र नाराजी पसरली आहे. नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे औसा शहरातील नागरिक पाण्यापासून वंचित राहत असल्याने जनतेचा असंतोष निर्माण झाला आहे. औसा शहराला मागणी धरणातून सुरू झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली त्यातच विविध राजकीय पक्षांनी ही योजना आपणच आणली असल्याचे वर्तमानपत्रातील बातम्या व शहरात मोठे होर्डिंग लावून प्रसिद्धी केली. असे असले तरी औसेकर मात्र पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा पाण्यासाठी त्रस्त असून पंधरा दिवसातून एकदा नळाला पाणी येत असल्याने औसा वासियांची   पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या बाबीकडे नगरपरिषद प्रशासनाने व पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने लक्ष देऊन शहरवासीयांना वेळेत पाणीपुरवठा करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

Post a Comment

0 Comments