गणरायाच्या आगमनाचे वरून राजाने केले स्वागत

 औसा प्रतिनिधी
 दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले औसा शहर आणि तालुक्यामध्ये विविध गणेश मंडळाच्या गणेश भक्तांनी गणरायाची मिरवणूक काढून हर्ष उल्हास यामध्ये स्थापना केली. गणरायाच्या आगमनाचे वरून राजाने ही हजेरी लावत स्वागत केले. मागील 15 ते 20 दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतातून झाला होता. शेतातील सोयाबीन उडीद मूग तूर ही खरीप पिके सुकल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता. औसा शहरात मानाचा गणपती वीरशैव गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने श्रीच्या मूर्तीची शहरातून मिरवणूक काढून गांधी चौक येथे मूर्तीची स्थापना केली. नरसिंह गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, रॉक गणेश मंडळ, मराठा गणेश मंडळ, धर्मवीर संभाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, शिव गणेश मंडळ, सिद्धिविनायक गणेश मंडळ, आजोबा गणेश मंडळ, महाराणा प्रताप गणेश मंडळ, महादेव गणेश मंडळ, नवयुवक गणेश मंडळ, आझाद गणेश मंडळ या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक काढून श्री गणेशाची स्थापना केली. गणरायाच्या आगमनामुळे वरून राजाची हजेरी लागल्यामुळे गौरी गणपतीच्या उत्सवामध्ये पाऊस येणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments