, औसा शहरातील मुख्य रस्ता रुंदीकरण टप्पा क्रमांक 3 कामाच्या प्रस्तावास निधी मंजूर करा: विलासराव देशमुख युवा मंचची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ता रुंदीकरण टप्पा क्रमांक 3 लातूर वेस हनुमान मंदिर ते जामा मस्जिद पर्यंत रस्त्यांचे भूसंपादनसह रुंदीकरण व सुधार कामासाठी अनेक वर्षांपासून औसा नगर परिषद मार्फत प्रस्ताव पाठविण्यात येत आहे,व मागील काही महिन्यांपूर्वी तत्कालीन लातूर जिल्ह्यातील पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हाधिकारी यांनी औसा शहरातील मुख्य रस्ता क्रमांक 3 अंतर्गत लातूर वेस हनुमान मंदिर ते जामा मस्जिद रस्त्यांचे भूसंपादनसह रुंदीकरण सुधारक काम करण्यासाठी अंदाजे 5 कोटी 57 लाख रुपयांचे प्रस्ताव प्रधान सचिव 1 नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे मंजूरीसाठी सादर केला आहे.सदरील रस्ता हा मुख्य बाजारपेठ ला जोडलेला असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे.सदरील रस्ता रुंदीकरण नसल्यामुळे या रस्त्याचे नगर परिषदेकडून काम करण्यात आलेले नाही, ज्यामुळे सदरील रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत.व तसेच पावसाळ्यात या रस्त्यावर पायी प्रवास करणे अवघड झाले आहे.तरी या प्रस्तावास निधी मंजूर करून औसेकरांना न्याय द्यावा, अन्यथा विलासराव देशमुख युवा मंच औश्याच्या वतीने लोकशाही मार्गाने लोकलढा उभा करण्यात येईल याची दखल घ्यावी.या मागणीचे निवेदन विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन 23 आॅगस्ट रोजी देण्यात आले.यावेळी खुंदमीर मुल्ला,अभयसिंह बिसेन, मुस्तफा अलुरे,मुकरम शेख,दिपक कांबळे यांची उपस्थिती होती.
0 Comments