महागाईचे चटके सहन करीत बळीराजाच्या सर्जा राजाचा उत्सव संपन्न 

औसा प्रतिनिधी 
संपूर्ण औसा तालुक्यामध्ये यावर्षी मध्यंतरी पडलेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततधार पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली त्यातच गोगलगायी सारख्या वन्य प्राण्याचा उपद्रव झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक फस्त झाल्यामुळे शेतकरी संपूर्णतः कोलमडला दिनांक 26 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या शेतात वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाचा बैलपोळा हा उत्सव साजरा करण्यासाठी शेतकऱ्याकडे आर्थिक संचन भासत असताना त्यातच आकाशाला भिडलेली महागाई आणि नैसर्गिक संकट या दोन्हीचा सामना करून शेतकऱ्यांनी औसा तालुक्यामध्ये आपल्या सर्जा राजाची मनोभावे पूजा अर्चा करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून बैलपोळा सण साजरा केला यावर्षी शेतकऱ्यांनी बैलांची मिरवणूक ढोल, ताशाच्या गजरात न काढता महागाई असल्यामुळे हलगीच्या सहाय्यानेच मिरवणूक काढत बैलाचा सण साजरा केला. तालुक्यात मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही तसेच शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेले नियमित कर्ज फेळणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन पर अनुदान ही अद्याप न दिल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीला तोंड देऊन महागाईची चटके सहन करीत आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठी कसरत करीत आहे.

Post a Comment

0 Comments