तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बेरुळे विरभद्र तर उपाध्यक्षपदी अमर लांडगे
औसा प्रतिनिधी 
 औसा तालुक्यातील आलमला येथे दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायतच्या वतीने तंटामुक्त समितीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री कैलास निलंगेकर हे उपस्थित होते. या ग्रामसभेमधून आलमला तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्री बेरूळे वीरभद्र यांची तर उपाध्यक्षपदी अमर लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अलमला तंटामुक्त समिती बिनविरोध काढण्याची परंपरा ग्रामस्थांनी यावेळी कायम राखली असून या निवड समितीच्या प्रसंगी उपसरपंच खंडेराव कोकाटे, तलाठी भागवत सोनवते, ग्रामसेवक गोपीनाथ राठोड, जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष शिवकुमार पाटील, शालेय समितीचे सदस्य वीरनाथ अंबुलगे, घरकुल विभागाचे शाखा अभियंता श्री भावले व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर अध्यक्ष वीरभद्र  बेरूळे व उपाध्यक्ष अमर लांडगे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments