कचरा व्यवस्थानाबाबत प्लास्टिक बंदी सप्ताह राबविण्याचा पालिकेचा निर्णय 
औसा प्रतिनिधी
 दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी रामदास कोकरे जिल्हा सह आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी औसा शहरास व नगरपालिकेत भेट दिली. प्रशासक तथा मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे नगर परिषद औसा यांच्यासोबत चर्चा करून शहरातील घंटागाडी चालक, व कामगार यांच्यासोबत शहरांमध्ये प्रत्यक्ष घंटागाडी सोबत कर्मचारी फिरून शहरातील नागरिकाकडून ओला व सुका कचरा, प्लास्टिक, कागद, काच, कापड, धातू इत्यादी घातक कचरा अशा तीन मुख्य प्रकारचा कचरा वर्गीकरण करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून नागरिकांना प्रोत्साहन द्यावे अशा सूचना मांडल्या.
 मुख्याधिकारी व नगरपरिषद च्या सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी करून आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विशेष घनकचरा व्यवस्थापन व प्लॅस्टिक बंदी सप्ताहाचे आयोजन करून शहरातील शंभर टक्के कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया व प्लास्टिक बंदी यशस्वी करावी असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती व सुक्या कचऱ्यापासून प्लास्टिक, कागद ,काच ,कापड, धातू इत्यादी घटक वेगळे संकलित करून मटेरियल रिकवरी फॅसिलिटी सेंटर येथे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील ज्या कुटुंबाकडून किंवा व्यापारी व व्यावसायिकाकडून कचऱ्याचे वर्गीकरण करून दिले जाणार नाही अशा संबंधितांना 5  हजार रुपये पर्यंतचा दंड आकारण्यात येईल असेही या बैठकीमध्ये सह आयुक्त रामदास कोकरे यांनी सूचविले. औसा नगर परिषदेच्या वतीने शंभर टक्के कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी सप्ताहाचे आयोजन करून शहरात संपूर्णतः प्लास्टिक मुक्ती करावी अशी शपथ या बैठकीत घेण्यात आली. या बैठकीस कर निर्धारण अधिकारी प्रदीप पाटील, बांधकाम अभियंता बालाजी विभुते, गणेश शिंदे, अमोल हेलाले, शिवकुमार हिरेमठ, शहर समन्वयक सौदागर, स्वच्छता निरीक्षक महेमूद शेख,  बालाजी कांबळे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments