हासेगाव फार्मसीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका उन्हाळी परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला असून श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजा करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी मंदिर गोविंदनगर रेणापूर चे महाराज श्री गोविंद तिरूमल्ले महाराज लाभले .तसेच महाविद्यालयातून प्रथम आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे, प्रथम वर्षातून प्रथम क्र. रोहन महाजन ७८.५०% द्वितीय क्र.सुजाता फजगे ७६.७०% तृतीय क्र. प्रतीक्षा ढगे ७५.९०% व द्वितीय वर्षातून प्रथम क्र. प्रतीक्षा कंजे ८०.५०%,दुतीय क्र.साक्षी हुलसुरकर ८०.१०%, तृतीय क्र.अपेक्षा राचट्टे ८०% या विद्यार्थ्याचे महाराजांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला आणि संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले "विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये छोटा मोठा उद्योग करावा स्वतःच्या पायावर उभे राहावे" असे सांगितले व प्राचार्य डॉ.श्यामला बावगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले "या यशामागे प्रत्येक विद्यार्थ्याचे कष्ट आणि जिद्द आहे करोना काळानंतर या विद्यार्थ्यांची पहिली पेन आणि पेपर लेखी परिक्षा होती. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे आपल्याला शिकवण्यासाठीचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करावे "असे सांगितले , या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर आप्पा बावगे, सचिव श्री वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष श्री. शिवलिंग जेवळे प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे, प्राचार्य नंदकिशोर बावगे, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विरेंद्र मेश्राम आणि शिक्षक व शिक्षितर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते या सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांच्या व पालकाच्या हस्ते महाविद्यालयामध्ये वृक्षरोपण करण्यात आले .
0 Comments