भादा येथे इंदुरीकर यांच्या कीर्तनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न
 औसा प्रतिनिधी
 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाने देशभरात साजरा होत असताना भादा तालुका औसा येथे दिनांक 20 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुप्रसिद्ध प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समाज प्रबोधन पर कीर्तनाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर लोकसभा मतदारसंघाचे का सुधाकर शृंगारे, आणि औसा मतदारसंघाचे अभिमन्यू पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.
 निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी परंपरा जुगारून देण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे तसेच व्यसनाधीन होत असलेल्या तरुणांनी वेळीच सावधानता बाळगून व्यसनमुक्त झाल्याशिवाय आपल्या कुटुंबाची प्रगती शक्य नाही प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या पाल्यावर चांगले संस्कार घडविणे ही आज काळाची गरज असून सुसंस्कृत कुटुंब हीच देशाची खरी संपत्ती असल्याने संस्कृत कुटुंब हीच समाज व्यवस्थेची खरी ओळख असून त्यासाठी प्रत्येकाने भावी पिढी ला सुसंस्कृत करणे गरजेचे असल्याचे इंदुरीकर महाराज यांनी आपल्या प्रबोधन पर कीर्तनातून आवाहन केले. फॅशनच्या नावाखाली आणि व्यसनामुळे होत असलेली तरुण पिढीची बरबादी थांबविण्यासाठी पालकांनी दक्षता घ्यावी असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मुंबई उच्च न्यायालयाचे ऍड पांडुरंग शिवलीकर व त्यांच्या मित्र मंडळांनी केले होते. भादा येथे आयोजित कीर्तनासाठी भादा, बोरगाव, काळमाथा, कवठा, भेटा, आंदोरा, समदर्गा, वडजी, उटी, लखनगाव आधी गावातून हजारो कीर्तन प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments