पोलिस स्टेशन औसा यांच्या वतीने सर्व गणेश मंडळाचे प्रशासकीय इमारत येथे बैठकीचे आयोजन 
औसा 
 औसा शहरातील व ग्रामीण भागातील सर्व गणेश मंडळांना कळविण्यात येते की गणेश उत्सव सन 2022 संदर्भात पोलिस स्टेशन औसा यांच्या वतीने दिनांक 29 अॉगस्ट 2022 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय बाजूस प्रशासकीय इमारत येथे सर्व गणेश मंडळाचे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या सदर बैठकीस माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी, माननीय औसा तहसीलदार साहेब, माननीय उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग औसा,व माननीय उपविभागीय अभियंता महावितरण औसा,औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे सर्व अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तरी सर्वांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे,सदर या बैठकीस जे गणेश मंडळ बैठकीस हजर राहतील त्याच गणेश मंडळास गणेशोत्सव 2022 चा परवाना देण्यात येणार आहे याची नोंद सर्व गणेश मंडळानी घ्यावी.अशी माहिती पोलिस स्टेशन औसा यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments