स्वातंत्र्यदिनी मच्छिंद्रनाथ महाराज यांची लातूर ते औसा मॅरेथॉन 
औसा प्रतिनिधी
 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त औसा येथील मच्छिंद्रनाथ मल्लिनाथ महाराज यांनी लातूर ते औसा 20 किलोमीटर मॅरेथॉन करून स्वातंत्र्य दिनाचा अनोखा उपक्रम राबविला. माजी आमदार मल्लिनाथ महाराज यांचे ते पुत्र असून वयाचे 68 वर्ष पूर्ण झालेले असताना दररोज ते मॅरेथॉन दौड करीत असतात प्रत्येक माणसाने आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी शरीर संपदा सांभाळणे आवश्यक आहे असे त्यांना वाटते. लातूर ते औसा मॅरेथॉन दौंड मध्ये त्यांच्यासोबत रवींद्र सरदेशमुख, हनुमंत रामपुरे, पत्रकार रोहित हंचाटे, व कांबळे यांनी सहभाग नोंदविला. आरोग्य हेच धन असल्यामुळे आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज चालण्याची किंवा धावण्याची सवय असणे प्रत्येक माणसाला आवश्यक आहे. म्हणून मॅरेथॉन दौड मधून त्यांनी आरोग्य संवर्धनाचा संदेश दिला येथील महंत स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री कुमार स्वामी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मच्छिंद्रनाथ महाराज यांना मानवंदना देऊन प्राचार्य महेश्वर बेटकर यांनी मॅरेथॉन दौड मध्ये सहभागी झालेल्या औसा येथील पाचही भूमिपुत्राचा सत्कार केला. औसा ते लातूर 20 किलोमीटर मॅरात मॅरेथॉन दौड करून आरोग्य संवर्धनाचा संदेश देणारे मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या आजादी का अमृत महोत्सव मध्ये या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments