नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या तपासात होणारी दिरंगाई टाळण्याची मागणी
 औसा प्रतिनिधी 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथे निर्गुण खून करण्यात आला. फुले शाहू आंबेडकराचे नाव घेऊन महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षाची सत्ता असूनही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा तपास करण्यामध्ये जाणून बुजून दिरंगाई होत आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे महात्मा बसवेश्वराच्या विचाराचा वारसा चालविणारे एम एम कलबुर्गी, आणि बेंगलोर येथील पत्रकार गौरी लंकेश यांचाही अशाच प्रकारे खून करण्यात आला आहे. समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी सातत्याने धडपडणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची निर्गुण पणे हत्या झाली असून ही घटना लोकशाहीला लाजवणारी आहे. असे असताना या घटनेस नऊ वर्षे लोटले तरी नरेंद्र दाभोळकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणाऱ्या इतर कार्यकर्त्यांच्या खुनाचा अद्याप तपास झालेला नाही या तपासामध्ये होणारी दिरंगाई टाळून खुण्याचा तात्काळ तपास करून खून करणाऱ्या कठोर शासन करावे. अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औसा तालुका समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार औसा यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर माधव बावगे, अविनाश पाटील, विजयकुमार मिटकरी, एन जी माळी, सचिन मिटकरी, एसपी मंडळे, एचडी पाटील, ए बी डोके, आर एम हलकुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments