आजादी का अमृत महोत्सव पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे सुधीर पोतदार 
औसा प्रतिनिधी 
15 ऑगस्ट 2022 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला खेड्याकडे चला हा संदेश घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामीण भागात पदयात्रा काढण्यात येत असून ही पदयात्रा 12 ऑगस्ट रोजी औसा तालुक्यात येत असून तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रा सुधीर पोतदार यांनी दिले. औसा येथील शासकीय विश्रामगृहावर दिनांक 10 ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अँड दीपक राठोड व तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा सुधीर पोतदार म्हणाले की भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे नेहरू आणि गांधी यांची विचारधारा घेऊन काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू असून स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या त्यागातून विविध क्षेत्रांमध्ये विकासाची गंगा आणली आहे. एकेकाळी टाचणी आयात करणारा देश आज मोठे यंत्र व सर्वच प्रकारच्या अद्यावत वस्तूमध्ये आबूतपूर्व प्रगती केली असून देशामध्ये औद्योगिक क्रांती घडवून आणत विकासाला काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी चालना दिली हा विचार ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत या पदयात्रेतून पोहोचविण्यात येणार आहे. पदयात्रेमध्ये लातूर जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका व नगरपालिका तसेच नगरपंचायत सदस्य हे उपस्थित राहणार असून औसा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी लिंबाळा, हरेगाव, जवळगा पोमादेवी, दापेगाव, नागरसोगा मार्गे आयोजित पदयात्रेत सहभागी व्हावे तसेच या पदयात्रेचा शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता औसा बसस्थानक येथे समारोप होणार असल्याची माहिती पोतदार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments