विभाजन विभिषिका स्मृतिदिनानिमित्त औसा शहरात भव्य मूक पदयात्रा
औसा प्रतिनिधी
दिनांक 14 ऑगस्ट हा भारत देशाच्या इतिहासात फाळणीचा दिवस असल्याने हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून देशभर पाळला जातो. या स्मृती दिनाच्या निमित्ताने औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर ते खादी कार्यालय पर्यंत औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य मूकपदयात्रा काढण्यात आली. यात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात राष्ट्रध्वज आणि कोणत्याही परिस्थितीत आम्हाला विभाजन मान्य नाही असे फलक होते. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता या पदयात्रेचा शुभारंभ झाला. आणि येथील खादी कार्यालयाच्या समोर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेमध्ये उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे, सुशील कुमार बाजपाई, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, प्रा. भीमाशंकर राजट्टे, धनंजय परसलगे, दौलत वाघमारे, भागवत कांबळे, भीमाशंकर मिटकरी, सौ कल्पना डांगे, सोनाली गुलबिले, सुनिता सूर्यवंशी, यांच्यासह महसूल कृषी सार्वजनिक बांधकाम नगरपरिषद महावितरण पंचायत समिती जिल्हा परिषद विविध कार्यालयासह सुमारे 27 कार्यालयातील विभागप्रमुख व सर्वच कर्मचारी यांच्यासह नागरिक अशा हजारो जणांचा या मूकपदीयात्रेमध्ये सहभाग नोंदविला होता.
0 Comments