अमृत महोत्सवी स्वातंत्र्य उत्सवामध्ये शासकीय कार्यालयासह राष्ट्रगीत साठी महिलाही आघाडीवर 
औसा प्रतिनिधी
  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा ही संकल्पना राबवून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याची प्रत्येक नागरिकाला संधी दिली. या उपक्रमामध्ये देशभरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्याला मानवंदना दिली. औसा शहरामध्ये तहसील कार्यालय व विविध शासकीय कार्यालयामध्ये दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत म्हणून देशवासीयांनी राष्ट्रगीताचा सन्मान केला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी परिपत्रक काढून शहरातील सर्व शासकीय कार्यालय संस्था व व्यापारी प्रतिष्ठान मध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन करावे असा संकल्प केल्यामुळे आझाद गल्ली येथील महिलांनीही सामूहिक राष्ट्रगीत गायनामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान केला. सामूहिक राष्ट्रगीत गायनासाठी औसा शहरातील महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे विविध शासकीय कार्यालय संस्था यांच्यासोबत महिलाही सामूहिक राष्ट्रगीत गायनासाठी आघाडीवर असल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments