विठ्ठल पाटील यांना पितृशोक
 औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील विठ्ठल पाटील यांचे वडील माधवराव शिवमुर्ती घोडके पाटील वय 100 वर्ष यांचे मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वर्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे. जुन्या पिढीतील प्रयोगशील शेतकरी म्हणून माधवराव पाटील पंचक्रोशीत सुपरीचीत होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नाहोली  येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी नातेवाईक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments