ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज औसा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
 औसा प्रतिनिधी
 ज्येष्ठ नागरिक संघ औसा आणि नगरपरिषद औसा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता श्री केदारनाथ मंगल कार्यालय औसा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक गोविंद पुरकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रा चंद्रकला भार्गव प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या लातूर या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थी पालक व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन जेष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ कोरे, उपाध्यक्ष आर के शिंदे, सचिव डी बी जोशी, तळणीकर सहसचिव, व्ही जी वैजवाडी आणि नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या वतीने करण्यात येते.

Post a Comment

0 Comments