विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी प्रयत्न करावेत- आ.सतीश चव्हाण

औसा प्रतिनिधी 

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञान आणि स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक भवितव्य घडवित असताना जगाची पावले ओळखून स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जागतिक पातळीवर होणाऱ्या स्पर्धेची तयारी करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन आमदार सतीश चव्हाण यांनी केले. फत्तेपुर तालुका औसा येथील श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे विद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की विविध विषयाचे विपुल वाचन करण्यासाठी संदर्भ ग्रंथ वाचणे आवश्यक असून जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवावे. उच्च पदावर काम करण्याची जिद्द ठेवावी असे विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पाटील हे होते. यावेळी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.बाबुराव मोरे, सचिव प्रा.दत्तात्रेय सुरवसे, कोषाध्यक्ष दयानंद चौहान ,उपाध्यक्ष सुनीता गिरवलकर, सहसचिव प्रा.रमेश लटुरे, सदस्य बालासाहेब मसुरे, सुयोग सुरवसे, प्रा.सतीश इंगळे, मारुती साखर कारखान्याचे संचालक शामराव पाटील, प.स. मा. उपसभापती दिनकर मुगळे, मुख्याध्यापक मुळे, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कुमारी साक्षी दळवे, गायत्री तौर, निकिता मोगरगे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments