समाजात "शिक्षणाला महत्त्व" ही काळाची गरज आहे - समीर काझी.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप...
औसा/ प्रतिनिधी : - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दि. 23 जूलै 2022 शनिवार रोजी ठिक 11: 00 वाजता औसा येथील तहसील कार्यालय शेजारील सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन आ.अभिमन्यू पवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दत्तात्रेय पवार (गुरुजी), कार्यक्रम उद्घाटक महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाचे सदस्य तथा लातूर जिल्ह्याचे पालक सदस्य समीर काझी, प्रमुख पाहुणे संतोषप्पा मुक्ता, व परिक्षीत पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून राष्ट्रीय हुतात्मांचे चित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे सदस्य तथा लातूर जिल्ह्याचे पालक सदस्य समीर काझी यांनी सांगितले की, समाजात शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणामुळे मानवात खुप मोठया प्रमाणावर बदल झाले आहे. शिक्षण घेतल्यामुळे मानवाला आपल्या हक्काचे महत्त्व समजते. आजच्या कळात पैसा संपत्ती याला महत्त्व न देता फक्त आणि फक्त शिक्षणाला महत्त्व दिले गेले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच दत्तात्रेय पवार (गुरुजी), भाजप युवा नेते संतोषप्पा मुक्ता, इम्रान सय्यद, शिवरुद्र मुर्गे यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमास शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पालकांसह विद्यार्थी, विद्यार्थींनींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
औसा शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थी मुला-मुलींना शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले. या शालेय साहित्याचे किट वाटपामध्ये विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, वह्या, पेन, कंपास असलेल्या किट बॅग वाटप करून विविध कार्यक्रमाने देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे युवा नेते संतोषप्पा मुक्ता, भाजपचे माजी नगरसेवक सुनील उटगे, शिवरूद्र मुर्गे, प्रा.भिमाशंकर राचट्टे, कंटप्पा मूळे, गोपाळ धानुरे, भाजपचे शहराध्यक्ष लहु कांबळे,, दिंगबर माळी, विनोद जाधव, कल्पनाताई डांगे, सोनाली गुडबिले, मकरंद रामपूरे, जगदीश चव्हाण, सुशीलकुमार दादा वाजपेयी, रामेश्वर दुधनकर, दत्ता पुंड, अच्युत पाटील, समाधान भिसे, संजीव कुलकर्णी शकील भाई बागवान, आनंद दादा लोमटे, शफी भाई काझी, मुस्तखीम काझी, याबरोबर शहरातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांच्यासह सर्व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेळके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुलतान शेख सर यांनी केले.
0 Comments