महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बोंबाबोंब आंदोलन..........
औसा प्रतिनिधी 
 औसा तालुक्यासह लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक गावात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून महावितरणच्या अशा भोंगळ कारभारामुळे या भागातील कुठल्याच गावात थ्री व सिंगल फेजचा वीजपुरवठा कधीच वेळेनुसार होत नाही. ऊर्जा खात्याच्या या मनमानी कारभाराला या भागातील ग्राहक, नागरिक व शेतकरी वैतागले असून यात सुधारणा व्हावी व वीज पुरवठा सुरळीत व्हावा तसेच जनतेची हेळसांड होऊ नये आणि महावितरणच्या भादा शाखा कार्यालयावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता भादा शाखा कार्यालयाचे विभाजन करून शिवली शाखा कार्यालयाची नवीन निर्मिती करण्यात यावी जेणेकरून या भागातील ग्राहक, नागरिक व शेतकरी यांची गैरसोय दूर होईल व भादा शाखेच्या कार्यालयातील शाखा अभियंता व कर्मचाऱ्यावरील कामाचा भार कमी होईल तसेच शिवली शाखेसाठी एक स्वतंत्र अभियंता व इतर कर्मचारी अधिकचे मिळतील.या प्रमुख मागणी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज भादा तालुका औसा जिल्हा लातूर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.... याप्रसंगी तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने,महेश बनसोडे, सचिन बिराजदार,गोविंद चव्हाण,राजेंद्र कांबळे,तानाजी गरड,नवनाथ कुंभार,धनंजय चिखले, किशोर आगलावे,प्रल्हाद बनसोडे,अनिल कांबळे,हनुमंत येनगे,अमोल थोरात इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments