आफताब शेख यांचा साध्या पद्धतीने विवाह सोहळा आणि थाटात स्वागत समारोह
 औसा प्रतिनिधी
 औसा येथील महाराष्ट्र रिपोर्टरचे पत्रकार आफताब शेख यांचा विवाह सोहळा अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. मुलगी पाहण्यासाठी जाऊन एकमेकाची पसंती होताच अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यानिमित्त पत्रकार आफताब शेख यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारोह कार्यक्रमासाठी नगरपरिषद सांस्कृतिक सभागृह औसा येथे हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. औसा येथील जेष्ठ पत्रकार राजू पाटील, काशिनाथ सगरे, आसिफ पटेल, एस ए. काझी, राम कांबळे, बालाजी शिंदे, इलियास चौधरी ,महबूब बक्षी,मजहर पटेल,पाशाभाई शेख यांच्यासह अनेक पत्रकारांनी शुभेच्छा देऊन आफताब शेख यांच्या वैवाहिक जीवनासाठी अभिष्टचिंतन केले.

Post a Comment

0 Comments