शैव परंपरा विश्वात श्रेष्ठ मानली जाते 
........उज्जैन जगद्गुरु यांचे प्रतिपादन 
औसा (प्रतिनिधी)दि.२३
भारत हा संस्कृती प्रधान देश असून या देशांमध्ये 33 कोटी देवी आणि देवतांच्या उपासना केली जाते. आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास पाळला जातो या चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान विष्णू निद्रिस्त अवस्थेत असतात परंतु भगवान शंकर यांचा निद्रेचा कोणताही कालावधी निश्चित नसल्यामुळे आषाढ महिन्यामध्ये सुद्धा भगवान शंकराची उपासना, भक्ती भवानी केली जाते. म्हणून शैव परंपरा ही अवघ्या विश्वात श्रेष्ठ मानली जाते. असे प्रतिपादन उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु श्री श्री 1008 सिद्धलिंग
 राजदेशीकेंद्र महास्वामीजी यांनी केले.
 औसा येथील हिरेमठ संस्थानच्या 82 व्या वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित धर्मसभेला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी धर्म पिठावर हिरेमठ संस्थांचे मार्गदर्शक डॉ श्री 108   शांतवीर शिवाचार्य महाराज, अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर, हिरेमठ संस्थानचे पिठाधिपती बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील, सुभाष आप्पा मुक्ता, बसवराज धाराशिवे यांची उपस्थिती होती. धर्मसभेला संबोधित करताना आपल्या अमृतवाणीतून उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरू पुढे म्हणाले की, काया, वाचा, मनाने उपासना करणाऱ्या सर्व भक्तांना देवाधिदेव महादेव हा सतत प्रसन्न होतो. भगवान शंकर म्हणतात मी मंदिर किंवा मठामध्ये वास्तव्य करत नाही त्यामुळेच कन्नाप्पा सारख्या भक्ताला माहिती नसताना अज्ञात पणे बेल किंवा जल अर्पण करूनही अभिषेक झाल्यामुळे त्यांच्या सारखा भक्त श्रेष्ठ बनला हिरेमठ संस्थानचे लिंगैक्य  गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी आपल्या तपस्या आणि ज्ञानाच्या साह्याने मागील आठ दशकापासून अखंडपणे ईष्टलिंग, महापूजा आणि शिव दीक्षा सोहळ्याचे आयोजन करून शिष्यांना ज्ञानदानाचे अविरत कार्य केले. हिरेमठ संस्थान हे ज्ञानदाना सोबत अन्नदान करणारे सामर्थ्यशाली भक्ती स्थळ बनले आहे. असेही श्रीमद जगद्गुरु यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ शांतवीर शिवाचार्य महाराज यांनी हा ज्ञान यज्ञ पुढे चालवत अध्यात्माची सेवा केली. भक्तांनी सिद्धांत,शिखामने, तत्वामृत, ग्रंथातील सात कोटी मंत्रापैकी पंचाक्षर महामंत्र म्हणून श्रेष्ठ मानला आहे. ओम नमः शिवाय जप केल्याने भक्तांना प्रसन्नतेचा व भक्तीची ऊर्जा प्राप्त होते. यावेळी श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे यांनी अनुवादित केलेल्या परम रहस्य ग्रंथाचे प्रकाशन उज्जैन जगद्गुरु यांच्या अमृत हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ शांतवीर शिवाचार्य महाराज आणि जिंतूर येथील अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांचेही अर्शिवचन झाले संस्थानाच्या वतीने आयोजित धर्मसभेला हजारो महिला, पुरुष, भक्तगण उपस्थित होते. सामाजिक क्षेत्र व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा श्रीमद जगद्गुरु यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रमाचे सूत्रसंचालन प्रा, युवराज हलकुडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments