गीताई सेवाभावी संस्थेला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सेवा करण्याचा मान
औसा प्रतिनिधी
औसा येथील गीताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आली असून या संस्थेने आषाढी वारी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा करण्याची गीताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला संधी द्यावी अशी विनंती केली होती. संस्थेच्या वतीने मंदिर समितीकडे अर्ज करण्यात आला होता. या संस्थेच्या अर्जाची दखल घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गीताई सेवाभावी संस्थेला सेवा करण्याची संधी दिली असून या संस्थेचे 30 सेवाधारी अन्नछत्र विभागामध्ये कार्यरत आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी यात्रेनिमित्त सेवा करणारी मराठवाड्यातली ही पहिलीच संस्था असल्याचे संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले. मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ मंगलबाई दयानंद भोसले यांनी आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments