रुपामाता उद्योग समूह म्हणजे शेतकऱ्यांनी उभारलेली चळवळ - अजित (दादा) गुंड..
औसा/ प्रतिनिधी : - रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, रुपामाता दूध उत्पादक संघ आणि रुपामाता गुळ पावडर निर्मितीचा कारखाना अशा विविध उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी शेतकऱ्यांनी उभा केलेली ही चळवळ आहे, असे प्रतिपादन रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्यकारी संचालक ॲड. अजित(दादा) गुंड यांनी केले. औसा येथील रूपामाता पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या दूध उत्पादक व दुध संकलन शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीधर शिंदे, सहाय्यक आयुक्त पशु चिकित्सालय औसा, आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक मुळे, रुपामाता मल्टीस्टेटचे कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, दूध संकलन अधिकारी शुक्राचार्य घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून पतसंस्थेच्या माध्यमातून 400 पेक्षा अधिक कोटी रुपयांचे भाग भांडवल जमा झाले आहे. 2003 साली या पतसंस्थेची स्थापना झाली होती. आता 296 कोटी रुपयांच्या ठेवी असून, शेतकऱ्यांना जोडधंदा करता यावा म्हणून 256 कोटी रुपयाचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. 37 लाख लिटर दुधाचे उत्पादन रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून होत असून शेतकऱी वर्गाणी उद्योगाशी जोडले जाणे हे अपेक्षित असून शेतकरी वर्गाने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय हा वरदान ठरणार आहे. शेतीशी निगडित उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होऊ शकते. त्यासाठी तळमळीने काम करण्याची गरज आहे, असेही शेवटी ॲड अजित (दादा) गुंड यांनी स्पष्ट केले, यावेळी बोलताना डॉ. श्रीधर शिंदे म्हणाले पशुधनाच्या आरोग्यासाठी वाळलेला चारा आवश्यक असून जनावरांचे साथीच्या रोगापासून रक्षण करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या पशुधनाची जोपासना करीत असताना दुधाळू जनावराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगून रूपामाता उद्योग समूहाने अल्पावधीत शेतकरी वर्गासाठी विविध कल्याणकारी योजना राबविलेल्या कामाचे कौतुक केले, यावेळी डॉ. दीपक मुळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर पालक संचालक रंगनाथ कदम, विभागीय व्यवस्थापक गोपाळ जंगाले, शाखा व्यवस्थापक किशोर जंगाले, आदींची उपस्थिती होती. दूध उत्पादक व दुध संकलन शेतकरी मेळाव्यास तालुक्यातील शेकडो दूध संकलन उपस्थित होते.
0 Comments