मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करा: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरात व परिसरात कुत्र्यांची होत असलेली वाढ ही शहरातल्या नागरिकांसाठी खूप मोठी समस्या झाली आहे. मोकाट कुत्र्यापासून लहान मुलांना जीवितास धोका निर्माण झाला आहे. व रात्री उशिरा जर बाहेर पडायचे असेल तर मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड अंगावर येत आहेत व चावा घेत आहेत. आणि त्यांची संख्या कमी करणे, किंवा त्यांच्या वाढत्या वंशात आळा घालणे खूप गरजेचे आहे. कुत्र्यांच्या या वाढत्या संख्येने लहान मुलांना व वृद्ध माणसावर धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी एम आय एम च्या वतीने अनेक वेळा विनंती करूनही अद्याप कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी वरील बाबीचा विचार करून  औसा शहरातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा  तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी दिनांक 18 जुलै 2022 सोमवार रोजी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनावर यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments