रोजगार सेवकांना सोबत घेऊन तालुक्यांचा विकास करणार.....ऐपीओ बारबुले

ग्रामरोजगार सेवकाकडून नुतन नरेगा कर्मचाऱ्यांचा सत्कार


औसा प्रतिनिधी

मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या नरेगातील कर्मचारी यामध्ये सहाय्यक कार्यक्रमा अधिकारी,तांत्रिक अधिकारी लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या बदल्या आतापर्यंत झालेल्या नव्हत्या.त्यामुळे नरेगा विभागात कंत्राटी कर्मचारी यांची मनमानी कारभार सुरू झाला होता. तालुक्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या.यामुळे सर्वत्र नरेगा कर्मचारी यांच्या मनमानी विरोधात जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला होता.यांची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या दूरदृष्टीपणामुळे औसा तालुक्यातील आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांश कर्मचारी हे  एकाच ठिकाणी  5 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणाहून बदली करण्याची मोहीम हाती राबविण्यात आली होती. त्यामुळे नव्याने औसा पंचायत समितीत रूजू झालेल्या सर्व नरेगा कर्मचारी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,नरेगा कक्ष अधिकारी, तांत्रिक अधिकारी, लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा औसा तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेकडून शाल पुष्पगुच्छ देऊन नरेगा विभागात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सहायक कार्यक्रम अधिकारी सुर्यकांत बारबुले म्हणाले कि तालुक्यातील सर्व रोजगार सेवक यांना सोबत घेऊन तालुक्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यामुळे सर्व रोजगार सेवक यांच्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी नरेगा कर्मचारी कटीबद्ध राहतील.रोजगार हमी योजनेचा रोजगार सेवक हा कणा आहे.त्यांच्या शिवाय नरेगा चालणे शक्य नाही.त्यामुळे रोजगार सेवक यांच्या शिवाय नरेगा चालवणे अशक्य आहे.असेही ते बोलताना म्हणाले. यावेळी कक्ष अधिकारी राजीव श्रंगारे बोलताना म्हणाले की रोजगार सेवक हा नरेगांचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे येथून पुढे प्रत्येक महिन्याला रोजगार सेवक व सर्व नरेगा कर्मचारी यांची बैठक घेण्यात येईल व रोजगार सेवक व नरेगा कर्मचारी यांनी समन्वयाने काम केले तरच तालुक्यांचा विकास होईल.कोणत्याही नरेगा कर्मचारी यांनी रोजगार सेवक यांना डावलून काम करू नये. असे ते म्हणाले. यावेळी तालुक्यातील रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष चांद शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन बालाजी उबाळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments