अतिवृष्टी पावसामुळे खरीप पिकांची प्रचंड नुकसान झाली असल्यामुळे त्वरित पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा-किशोर जाधव
औसा प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदारसंघातील औसा तालुका गावातील शेतकरी यांच्या खरीप हंगामातील पिके अतिवृष्टी पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक नुकसानीस तसेच अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या करून देखील त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रचंड पावसामुळे या भागांमध्ये गोगलगायचे प्रमाण वाढल्यामुळे देखील पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मधून आधार देण्यासाठी आपल्या मार्फत त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती औसा तथा शिवसेना तालुका समन्वयक किशोर अरविंद जाधव यांनी आज दिनांक 29  जुलै 2022 शुक्रवार रोजी औसा तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर  यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments