वार्षिक उत्सवानिमित्त हिरेमठ संस्थान मध्ये आजपासून शिवकथा 

औसा प्रतिनिधी
 हिरेमठ संस्थांनच्या आषाढ मासी वार्षिक उत्सवानिमित्त प्रति वर्षाप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 16 जुलै पासून अखंड शिवनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले असून या सप्ताह कालावधीमध्ये ष.ब्र 108 श्री अमृतेश्वर महाराज जिंतूरकर यांच्या अमृतवाणीतून दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये शिव कथा आयोजित करण्यात आली आहे.हिरेमठ संस्थानचे लिंगेक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने आणि 108 डॉ.शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थांनचे पिठाधिपती ष.ब्र. 108 श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु श्री.श्री.श्री 1008 सिद्धलिंग राजदेशीकेंद्र महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात दिनांक 23 ते 25 जुलै या कालावधीमध्ये आशीर्वचन आयोजित करण्यात आले आहे.
उज्जैन पिठाचे जगद्गुरु यांच्या सानिध्यामध्ये ईस्टलिंग महापूजा आणि शिवदीक्षा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून हिरेमठ संस्थांनच्या वतीने आषाढमासी वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित अध्यात्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी कार्यक्रमास व महाप्रसादास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीरशैव युवक संघटना औसा व वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments