किल्लारी गटात उपसभापती किशोर जाधव यांचा दबदबा कायम,ग्रुप सोसायटीत दनदनीत विजय.
किल्लारी--
किल्लारी जिल्हा परिषद गटात उपसभापती किशोर याचा दबदबा वाढला असून तळणी,यळवट,बानेगाव,गांजनखेडा,तळणी तांडा,किल्लारी वाडी या सर्व गावची मिळून एकच ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटीत आहे अत्यंत प्रतिष्ठेची ही सेवा सोसायटी मानली जाते.दोन्ही पँनलने आपापली प्रतिष्ठा पणाला लावली होती.  उपसभापती किशोर जाधव व मित्रमंडळ यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा विकास पँनलने आघाडी घेत निवडणूक जिंकली.फक्त शेती आणि शेतकरी यांच्या विकासाचा ध्यास घेऊन लढणार्या या पँनलला मतदारांनी भरघोस कौल दिला.विद्यमान आमदार अभिमन्यु पवार यांच्या नावाचा वापर करून मते मागणा- चाना यांच्या पँनलला मतदारांनी नाकारले तर बळीराजा विकास पॅनेल यांच्या पँनलचे देविदास पवार,किशोर जाधव,अशोक जाधव,शुभम पवार, हाशीम पटवारी,प्रल्हाद पाटील, चेतन तौर,मच्छिंद्र तौर,फुलचंद राठोड,मोहन गायकवाड, कावेराबाई पवार, शोभा पाटील हे बहूमताने निवडून आले. तर शंकर कुंभार हे बिनविरोध निवडून आले असून
* यामध्ये राष्ट्रवादी चे सुभाष पवार,बानेगावचे शिवशंकर मोरे,पांडूरंग बिराजदार तळणी चे रामकृष्ण बसूळे,खुलास पाटील, कमलाकर जाधव,शाहूराज पाटील, भरत पाटील, अंकुश परताळे,माधव मुगळे,बालाजी घोडके, बाबूराव समुद्रवाने,प्रकाश भुजबळ,तुकाराम कांबळे,महंमद सय्यद, खलील सय्यद यळवटचे सिताराम जाधव,दादाराव बिराजदार, राजाराम जाधव, महादेव पाटील,नितु पाटील ,माधव जाधव, शरद शिंदे, भागवत बिराजदार, गांजनखेड्याचे व्यंकट पाटील, हरिदास ढेकणे,धनराज जवळगे,वसंत होळकर तळणी तांड्याचे बाबूराव राठोड,कोंडीबा राठोड,शंकर आडे,हिरासिंग चव्हाण,सुरज बाबळसुरे,किशोर भोसले आदींनी परिश्रम घेतले तर काँग्रेस नेत्याचे, शिवसेना नेत्याचे, राष्ट्रवादी नेत्याचे सहकार्य लाभले आसे किशोर जाधव यानी सांगितले.

Post a Comment

0 Comments