देवंग्रा शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप 
औसा प्रतिनिधी 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवंग्रा येथील शाळेच्या वतीने व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार श्रीमंत मोरे, सुरेश कोतापुरे, यांची उपस्थिती होती. देवंग्रा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात गणवेश वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन मुख्याध्यापकांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उलपे जीव्ही, प्रदीप ढेकरे, वर्षा कारले, तृप्ती गुडसूरकर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments