औसा बस स्थानकातील घाणीचे साम्राज व पडलेले खड्डे दुरुस्त करा-सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मागील अनेक दिवसांपासून औसा बस स्थानकात प्रवेशद्वारात मोठे खड्डे झाले असून त्या खड्ड्यात पाणी साचलेला आहे त्या खड्ड्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. यापूर्वी 2017 मध्ये अशाच प्रकारचे खड्डे पडले होते त्यावेळेस ही महामंडळाला आमच्या मार्फत पाठपुरावा करून खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. व महामंडळाने खड्डेही बुजून घेतले होते आज पर्यंत त्याला डांबरीकरण करून घेण्यात आले नाही त्यामुळे काही काळानंतर कोविडच्या काळात एसटी बंद असूनही औसा बस स्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे औसा एक ऐतिहासिक शहर असून बाहेरील येणाऱ्या प्रवाशांना बस स्थानकात येजा करण्यासाठी खूप त्रास होतो. व औशात मोठ्या प्रमाणात प्रशाला आहेत व ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व विद्यार्थी व व्यापारी व वयोवृद्ध नागरिक यांना आपली बसेस येईपर्यंत घाणीत व चिखलात थांबावे लागत आहे. दोन्ही प्रवेशद्वारा जे खड्डे पडले आहेत ते तातडीने बुजून बस स्थानकात बसण्यासाठी सोय करण्यात यावी तरी साहेबांनी यावर तातडीने उपाययोजना करून तालुक्यातील व शहरातील जनतेला होत असलेला त्रास दूर करण्यात यावा व बस स्थानकातील पसरलेले घाणिचे साम्राज्य संपण्यात यावे. बस स्थानकातील हे काम आठ दिवसांच्या आत पूर्ण न केल्यास एम आय एमच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी एस टी महामंडळाचे औसा आगार प्रमुख  यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments