पुरवठा विभागाच्या आयएसओ नामांकनासाठी औसा येथे बैठक संपन्न
 औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग आणि शासकीय धान्य गोदामास आय एस ओ नामांकन मिळविण्यासाठी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये दिनांक 19 जुलै मंगळवार रोजी बैठक घेण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या बैठकीस सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यालयातील पुरवठा विभागात व धान्य गोडाऊन मध्ये सर्व अभिलेखे अद्यावत करणे, रास्त भाव दुकानदार व लाभार्थी यांच्या सोयी सुविधा पुरविणे, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींना बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. रास्त भाव दुकानांमध्ये लाभार्थीच्या योजनानिहाय याद्या ठेवणे, रंगकाम करणे, सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, फायर फायटर बसविणे, स्मोक, डिटेक्टर, प्रथमोपचार पेटी, दुकानाचा बोर्ड, भाव फलक व आय एस ओ नामांकनासाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सोयी सुविधा बाबत रास्त भाव दुकानदार महसूल कर्मचारी आणि उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस तहसीलदार भरत सूर्यवंशी, तालुका पुरवठा अधिकारी लालासाहेब कांबळे, व पुरवठा विभागाचे कर्मचारी व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान चालकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments