पवार-मोहिते परिवाराच्या साक्षगंध सोहळ्यास आ. रमेशआप्पा कराड यांची उपस्थिती 
लातुर प्रतिनिधी 
         औसा विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आ अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव परीक्षित आणि डॉक्टर उदयकुमार मोहिते पाटील यांची कन्या चैताली यांचा साक्षगंध सोहळा गुरुवारी दुपारी लातूर येथील थोरमोटे मंगल कार्यालयात संपन्न झाला. या सोहळ्यास भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशअप्पा कराड आवर्जुन उपस्थित राहून भावी वधु वरांना शुभाआर्शिवाद दिले.
         यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, शिवाजीराव केंद्रे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, पत्रकार रामेश्वर बद्दर, भाजपाचे जिल्हा संयोजक तुकाराम गोरे, लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे अध्यक्ष अनिल भिसे, राजकिरण साठे, श्रीकृष्ण पवार यांच्यासह अनेक जण होते यावेळी आ. कराड यांचे पवार आणि मोहिते परिवाराच्या वतीने आ अभिमन्यू पवार यांनी स्वागत केले.

Post a Comment

0 Comments