वडमुरंबी येथे विविध योजनाचे कँम्प संपन्न
देवणी प्रतिनिधी : वडमुरंबी ता देवणी जि लातूर येथे नुकताच बँकींग विविध योजना विषयी कँम्प घेण्यात आला त्यात भारतीय रिझर्व्ह बँक यांचा संरक्षणाखाली क्रिशील फाऊंडेशन चा सहकार्याने मनीवाईज *वित्तीय* साक्षरता सेंटर देवणी व महाराष्ट्र ग्रामीण बँक देवणी यांचा संयुक्त विद्यमाने मौजे वडमुरंबी येथे कँम्प घेण्यात आला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचा व शेतकरी यांचा शेतीशी जोड धंदा व्हावा म्हणून येथील लोकांना वित्तीय साक्षरता आणि बँकींगचा वेगवेगळ्या योजना व सोशल सेक्यूरीटी प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधान मंत्री जिवन जोती विमा योजना , अटल पेन्शन योजना स्वताचा आर्थिक संकलप, बचत व गुणतंवनुक बँक लोन ,सिबील स्कोर, डिजीटल व्यवहार ,इत्यादी वर मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर चे सेंटर मँनेंजर धोत्रे हुसेन यांनी माहिती दिली व महाराष्ट्र ग्रामीण बँक देवणी शाखेचे मँनेजर देशपांडे यानी विविध कर्जा विषयी सविस्तर उपस्थित नागरीकाना माहिती दिली आणि सि एफ एल देवणी ब्ललाँक फिल्ड काँडीनेटर जयश्री सोनकांबळे,ग्रामीण बँकेचे आँफीसर प्रशांत राजमाने, कॅशियर सुनिल पांडे, सेवक राहुल बिरादार, पठान आसरार, बी सी शिवाजी म्हेत्रे यांनी पण विविध योजना वर माहिती दिली.
0 Comments