माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी
लातूर प्रतिनिधी २५ जूलै २०२२ :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज सोमवार दि. २५ जुलै २२ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या शिष्टमंडळ व नागरिकांच्या भेटी घेऊन निवेदनाचा स्वीकार केला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना दिल्या.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, माजी महापौर दीपक सूळ, उपमहापौर कैलास कांबळे, माजी नगरसेवक विजयकुमार साबदे, अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूरचे अध्यक्ष मिथुन गायकवाड, जी.ए.गायकवाड, अनिल शिंदे, जेष्ठ पत्रकार अशोक देडे, सुनील बसपुरे, सुनील वैरागे, प्रा. माधव गादेकर, माजी नगरसेवक इमरान सय्यद, बाबासाहेब गायकवाड, प्रा. अमोल शिंदे, मनोज चिखले आदी उपस्थित होते.
0 Comments