गीताई सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार 

औसा प्रतिनिधी
 
औसा येथील गीताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी आषाढी वारी निमित्त येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची या संस्थेला मंदिर समितीने संधी दिली होती. या संस्थेचा वतीने अन्नछत्र विभागांमध्ये आषाढी वारी निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा केल्याबद्दल विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी वारी संपल्यानंतर प्रक्षाळ पूजा करण्यात आली. आणि प्रक्षाळ पूजेनंतर गीताई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ मंगलबाई दयानंद भोसले व त्यांच्यासोबत असलेल्या इतर सेवाधारी पदाधिकाऱ्यांचा मंदिर समितीने सन्मानपत्र देऊन गौरव केला.

Post a Comment

0 Comments