संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग लाभार्थ्यांचे मागील तीन महिन्यांचे थकीत मानधन त्वरित वाटप करा: खुंदमीर मुल्ला
औसा प्रतिनिधी
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, दिव्यांग लाभार्थ्याचे मागील तीन महिन्याचे थकीत मानधन त्वरित वाटप करा. या मागणीसाठी आज दिनांक पाच जुलै मंगळवार रोजी विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाचे  सविस्तर वृत्त असे औसा तालुक्यातील हजारो संजय गांधी निराधार, श्रावण बाळ दिव्यांग लाभार्थ्यांचे मागील तीन महिन्याचे मानधन वाटप झाले नसल्याने सदरील लाभार्थ्यांना सध्या आर्थिक तंगी निर्माण झालेली आहे. व तसेच येत्या 10 जुलै रोजी आषाढी एकादशी व बकरीद सण येत आहेत. या दोन्ही मोठ्या सणाच्या अगोदर गोरगरीब निराधार, दिव्यांग यांच्या थकीत तीन महिन्याचे  मानधन त्वरित त्यांच्या खात्यावरती जमा करून उपकृत करावे. या मागणीचे निवेदन विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला यांनी औसा तहसीलदार यांना निवेदन दिले.या निवेदनावर यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments