राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या शहर अध्यक्षपदी सोहेल पठाण यांची निवड 
औसा प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या औसा शहर अध्यक्षपदी प्रांत अध्यक्ष तथा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष एशियन साळुंखे आणि सचिव व्ही व्ही यादव दबडगावकर यांनी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शरद चंद्र पवार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारानुसार राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांचे संघटन मजबूत करावे आणि पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करावे अशी अपेक्षा आमदार विक्रम काळे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करताना व्यक्त केली. सोहेल नयुम पठाण यांच्या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अफसर शेख,  माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख, सुलेमान शेख, प्राचार्य निजाम शेख, नय्युम पठाण, नगरसेवक मुजाहिद शेख, रुपेश दुधनकर भरत सूर्यवंशी, गोविंद जाधव, अविनाश टिके, कृष्णा सावळकर,  यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments