सिटी ब्लड स्टोरेज सेंटरला मौलानांनी दिली भेट..
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील याकतपुर रोड येथील कसबे हॉस्पिटल येथे प्रथमच सिटी ब्लड सेंटर चालू असून या सेंटरचे मालक ज्ञानेश्वर खोजे, व महेबूब खडकाळे यांनी आमच्या सेंटर ला भेट देण्यासाठी विनंती केली होती. यांच्या विनंतीला मान देऊन औसा येथील मौलाना खारी रफिक सिराजी व तसेच मौलाना नाझीम साहब यांनी आज दिनांक 29 जुलै शुक्रवार रोजी या सेंटरला भेट दिली असता,या सेंटरमध्ये अत्याधुनिक सर्व सेवा सुविधा युक्त सेंटर चालू असून शहरातील नागरिकांना आपल्या हक्काचे ब्लड स्टोरेज सेंटर प्राप्त झाले आहे. शहरातील गरजू पेशंटांनी लातूरला न जाता औसा येथे सिटी ब्लड स्टोरेज सेंटर उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांना भेट देऊन आपले रक्तदान करावे असे आवाहन केले. यावेळी अडवोकेट समीयोद्दीन पटेल, अनवर कुरेशी, खुददुस कुरेशी, मुखतार कुरेशी,खाजा कुरेशी, चक्रधर शाळेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर मियां शेख यांनीही सिटी ब्लड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी या सर्व मान्यवरांचा सिटी ब्लड स्टोरेज सेंटरच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments