सामाजिक जाणीव जपणारे  नेतृत्व सामाजसेविका.... 
 श्रद्धा जगताप.......

समाजामध्ये काम करत असताना या समाजाने
आपल्यासाठी भरपूर काही दिले आहे. आपण देखील या समाजाचे काही देणे लागतो. अशा पद्धतीची सामाजिक जाणीव फार कमी लोकात असते. त्याला श्रद्धा जगताप अपवाद आहेत. असेच म्हणावे लागेल. समाजातील गरजू गोरगरीब लोकांना मदतीचा हात पुढे कधीच करताना त्या मागेपुढे पाहत नाहीत, पतंजली योग समितीच्या माध्यमातून तेलंगणा राज्यात आरोग्यासाठी त्यांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. आता आपल्या जन्मभूमीत, उदगीर येथे येऊन कार्य करावे म्हणून त्या सक्रिय झाल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करत असताना राजकारणा सोबतच समाजकारण यालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे. आई-वडिलांना अभिमान
वाटावा अशा पद्धतीचा आदर्श त्या निर्माण करत
आहेत, पुत्र व्हावा ऐसा गुडाण्याचा तिन्ही लोकी झेंडा असे म्हटले जायचे कारण घराण्याचे नाव उज्वल करण्यासाठी वंशाचा दिवा हवा असे समजले जात होते. मात्र आता काही मुली देखील
मुलापेक्षा जास्त कर्तबगारी दाखवू लागल्या आहेत. तसेच वेगळे उदाहरण म्हणून श्रद्धा जगताप यांच्या कामकाजाकडे पाहाता येऊ शकेल, उदगीर शहरातील विविध भागातून गरजू महिलांना सहकार्य करणे, त्याच्या संघटना उभ्या करणे, अशा पद्धतीच्या कामात त्यांनी रस घ्यायला सुरुवात केला आहे. एखादी महिला देखील समाजामध्ये कसा आदर्शाचा ठसा उमटू शकते आणि आपण देखील मोठे काम करू शकतो. हा संदेश इतरांना कसा देऊ शकते.
याचे उदाहरण म्हणून श्रद्धा जगताप यांच्या कामाकडे पाहिले जाऊ शकते. राजकारणाच्या पलीकडेही त्यांनी कार्य केले आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, त्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य सोबतच आर्थिक सहकार्य करणे असेही कार्य त्यांनी केले आहे. राजकारण करत असताना केवळ वारसा असून चालत नाही. तर त्यासाठी कष्ट आणि जिद्द असावी लागते. हे लक्षात ठेवून आपला प्रवास समाजकारणापासून त्यांनी सुरू केला आहे.
समाजाच्या उपेक्षित घटकासाठी काम करायला
त्यांनी आता प्रारंभ केला आहे. विविध प्रभागातील महिलांच्या व्यथा जाणून घेत, त्यावर उपाययोजना म्हणून काय करता येईल? यासाठीही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सतत महिलांशी सुसंवाद साधणे आणि पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून अडीअडचणी दूर करणे हे त्यांनी सुरू ठेवले आहे. आणि अडचणीचा पाठपुरावा करत राहिल्याने अनेक प्रश्न सुटले आहेत. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात आपला हातभार हवा म्हणून त्या सतत प्रयत्न करत आहेत. धार उड़ते आकाशी, चित्त तिथे पिलापाशी' म्हणतात. त्याप्रमाणे श्रद्धा जगताप कुठेही असल्या तरी, त्या उदगीर शहरातील
विविध प्रभागातील महिलांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काय करता येईल? याचाच विचार करताना दिसून येतात. सर्जनशील आणि सकारात्मक पद्धतीने राजकारण करता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या राजकीय वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments