उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज औसा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने हनुमान मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 62 जणांनी रक्तदान केले,तसेच औसा येथील मूकबधिर विद्यालयात मूकबधिर विद्यार्थी मुला-मुलींना शालेय साहित्य खेळणी वाटप करण्यात आले ,व ग्रामीण रुग्णालय औसा येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला, तसेच निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे फार्म भरून घेण्याचा कार्यक्रम नाथ मंगल कार्यालयात करण्यात आला यात 21000 रुपये चे उत्त्पन्न प्रमाण पत्र आमदार अभिमन्यू पवार व औसा तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले,व हासलगन येथे जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थ्यांना वह्या पेन वाटप करून विविध कार्यक्रमाने देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सुभाष जाधव, संतोष मुक्ता, सुनील ऊटगे, शिवकुमार मुर्गे,प्रा.भिमाशंकर राचट्टे, कंटप्पा मूळे,गोपाळ धानुरे,किरण उटगे,लहु कांबळे,पप्पुभाई शेख, मुक्तेश्वर वागदरे, विकास नरहरे, भिमाशंकर मिटकरी,समीर डेंग,दिंगबर माळी, विनोद जाधव, कल्पना ताई डांगे,सोनाली गुडबिले,धनराज परसने,मकरंद रामपूरे,जगदीश चव्हाण, सुशील वाजपेयी, रामेश्वर दुधनकर,दत्ता पुंड,अच्युत पाटील,समाधान भिसे,काका मोरे,संजीव कुलकर्णी व सर्व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments