सुभाषप्पा मुक्ता यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप
 औसा प्रतिनिधी
 औसा येथील वीरशैव समाजाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाषप्पा मुक्ता यांच्या वाढदिवसानिमित्त औसा  येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. सुभाषप्पा मुक्ता हे सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे दरवर्षी ते विविध सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा करतात. मागील काही वर्षात त्यांनी सेवालयातील विद्यार्थ्यांना गणवेश, व शैक्षणिक साहित्य वितरण, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन तसेच औसा शहरातील मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड असे उपक्रम राबविले होते. यावर्षी त्यांचे सुपुत्र गणेश मुक्ता यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन रणदिवे, ओम प्रकाश सोलापुरे, मुजम्मिल शेख यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments