महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशिक्षण प्रबोधन पर कार्यक्रम समिती सदस्यपदी अमर खानापुरे यांची निवड..
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची दिनांक एक व दोन जून 2022 रोजी शिर्डी येथे दोन दिवसीय नाव संकल्प कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत राजकीय समितीने भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाच्या समित्या स्थापन करण्याचे प्रस्तावित केले. त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार उद्दिष्टासह काही समित्या घटित करण्यात आले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी नेहरू आणि काँग्रेस विचार धारेवर राज्यभर प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, विविध व्यासपीठवर वकृत्व स्पर्धा, निबंध लेखन व नामवंत व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणे यासाठी प्रशिक्षण प्रबोधन पर कार्यक्रम समितीची स्थापन करण्यात आली असून त्यांच्या सदस्य पदी अमर खानापुरे यांची निवड करण्यात आली. तसेच समिती सदस्य म्हणून कुणाल पाटील, अमीर शेख, अभिजीत वंजारी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments