हसीना उर्दू शाळेत च्या पाठीमागे मोठ्या गटारी वरचे पूल धोकादायक झाले असून त्वरित दुरुस्त करा-खुंदमीर मुल्ला
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मोमीन गल्ली लगात गणपती विसर्जन साठी असलेले हसीना उर्दू शाळेच्या पाठीमागे मोठ्या गटारीवर असलेले पूल सध्या धोकादायक परिस्थिती असून या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे. व बाजूला शाळेकरी मुले याच पुलावर येजा करतात व तसेच पुढच्या महिन्यात गणपती विसर्जन उत्सव असून याच पुलावरून गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर वाहने जाणार आहेत. सध्या हे पूल अरुंद व धोकादायक झाल्यामुळे गणपती विसर्जन साठी अडथळा निर्माण होऊ शकतो, तरी मुख्याधिकारी यांनी  त्वरित वरील बाबीचा विचार करून सदरील पूल दुरुस्ती करून घ्यावे अशी मागणी विलासराव देशमुख युवा मंच औसा तथा तालुका दक्षता समिती सदस्य खुंदमीर मुल्ला यांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आज दिनांक 28 जूलै गुरूवार रोजी निवेदन सादर केले आहे.या निवेदनावर यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments