*स्वतःच्या कृती व वागण्यातून खरा आदर्श शिक्षक तयार होतो*
*एकाचवेळी १५ पुस्तकांचे प्रकाशन करणारे भारत सातपुते यांची ग्रिनिज बुकात नोंद*
*कवी भारत सातपुते यांनी शाळा घडवण्याचे कार्य केले*
*माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचे भाद्यात प्रतिपादन*
औसा प्रतिनिधी
जग बदलत असताना शिक्षण प्रणाली विकसित होत असून खरा हाडाचा शिक्षक स्वतःच्या वागण्यातून कृतीतून आदर्श शिक्षक बनू शकतो भादा सारख्या परिसरात शाळा घडवण्याचे कार्य कवी भारत सातपुते यांनी केले असून हे करीत असताना एकाच वेळी १५ पुस्तके प्रकाशन करणारे त्यांची नोंद ग्रीनिज बूकात होईल असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी औसा तालुक्यातील भादा येथे शनिवारी जिल्हा परिषद शाळेत आयोजीत११ पुस्तकांचे प्रकाशन सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, कवी भारत सातपुते, नाथसिंह देशमुख , मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, उपस्थित होते.
पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हनाले की भादा जिल्हा परिषद शाळा आज राज्याच्या टॉप टेन असलेल्या मोजक्या शाळेत झेप घेत आहे असे सांगून भारत सातपुते यांनी शाळेत शैक्षणीक उपक्रम विद्यार्थ्यासाठी राबवत वृक्ष, योगासन, व्यायाम, क्रीडा, संगणक याचेही शिक्षण देवुन विद्यार्थ्याना चांगले घडवण्याचे कार्य केले असून या चांगल्या कार्यासाठी भादेकर कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहीले याचाही उल्लेख त्यांनी करत ग्रामस्थांचे कौतुक केले.
*लेखक होण्यासाठी संवेदनशील मन लागते*
यावेळी बोलताना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी लेखक होण्यासाठी चौफेर नजर बुध्दी लागते त्याचबरोबर भांडार लागते त्यापेक्षा संवेदनशील मन लागते असा हा कवी भाद्यात आमच्यात आहे असे सांगून भारत सातपुते यांच्या कार्याचे कौतुक केले.
*लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या दूर दृष्टीने परीसरात परिवर्तन झाले*
भादा परिसरात जिल्ह्यांत सगळीकडे दळणवळण, रस्ते झाली उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठया फायदा झाला, साखर कारखाने उभी राहिली, सिंचन व्यवस्था वाढली शेतकरी सुधारला विकासाची कामे जलदगतीने झाली त्यांचे सर्व श्रेय लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी ४० वर्ष राजकारण समाजकारण करत विकास हा केंद्रबिंदू मानून काम केले सर्वांना मदत करण्याचे धोरण स्वीकारले दूरदृष्टी मुळेच सगळ चांगल घडले आहे याचे श्रेय लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या कडे जाते ते आजतागायत सुरू आहे पुढेही चालु राहील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त करत आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या भागात विकासाची कामे जलदगतीने सुरु झाली आहेत अधिकपने या भागात लक्ष देवुन कार्य करीत आहेत याचाही त्यांनी उल्लेख केला.
*मांजरा साखर परिवार मोठा*
राज्यात सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या मांजरा साखर परिवार हा मोठा परिवार असून जिल्ह्यांत ७ व परभणी जिल्ह्यात १ असे आठ साखर कारखाने परिवाराचे असून आम्ही फक्त विश्वस्त म्हणून कार्यरत आहोत या सर्व संस्थांत आर्थिक शिस्त पारदर्शकता असल्याने अतिशय काटेकोर पालन त्याची अंमलबजावणी होत असल्याने मोठ्या प्रमाणावर यावर्षी मोठया प्रमाणावर उसाचे गाळप करून आर्थिक मदत केली आहे.
यावेळी भादा येथील जिल्हा परिषद शाळेतील संगणक कक्षाचा व वृक्षारोपण शुभारंभ माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी कवी भारत सातपुते यांनी आपल्या मनोगतात लेखन ,शैक्षणीक क्षेत्रात देशमुख कुटुंबाचे नेहमी सहकार्य राहिले आहे चांगले कार्य करणाऱ्या प्रत्येक लातूरकरांना देशमुख परिवाराने त्यांचे कौतुक केले असून सतत सहकार्य करण्याची भावना ठेवलेली आहे असे यावेळी बोलताना सांगितले याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ अनुप शेळके, माजी संचालक संभाजी सुळ, हरिराम कुलकर्णी, प्रा. सुधीर पोतदार, सचिन दाताळ,रामदास पवार, सतीश पाटील, बालाजी साळुंके, मांजरा साखर कारखान्याचे संचालक सदाशिव कदम, महादेव खिचडे, भाद्या चे सरपंच सौ दरेकर, उपसरपंच बालाजी शिंदे, सूर्यकांत पाटील, राम पाटील, सोसायटीचे चेअरमन दत्तप्रसाद शिंदे, मुख्याध्यापक मोहन माकणे, इस्माईल मुलाणी, नागेश पाटील, प्रा. भास्कर बडे, प्रा. साखरे, भादा ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments