भादा जिल्हा परिषद प्रशाले कडून वृक्ष दिंडीचे आयोजन 

औसा-तालुक्यातील भादा जिल्हा परिषद प्रशाला भादा कडून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्व विद्यार्थी यांना घेऊन गावांमध्ये शुक्रवार दिनांक 29 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता एक वृक्ष दिंडीची फेरी काढण्यात आली.यावेळी ट्रॅक्टरवर लोक जागृत संत महात्म्यांचे फोटो आणि वृक्षाविषयी त्यांचे अभंगातील उल्लेख याचा रस्त्याने परिपाठ लावण्यात आला होता आणि घोषणाही "झाडे लावा झाडे जगवा!" पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक झाडे.
याबाबत विद्यार्थ्याकडून नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात येत होत्या यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर भादा ग्रामपंचायत समोरील चौकामध्ये या वृक्ष दिंडीचा समारोप करण्यात आला.
यावेळी वृक्ष लागवड सुरक्षा विषयी आणि शासकीय पत्रकाच्या अनुषंगाने हे वृक्षदिंडी काढली असल्याचे शिक्षकांनी भा दा ग्रामपंचायत चौकासमोर  मार्गदर्शन करताना सांगितले.

Post a Comment

0 Comments