स्व. ऍड.एस एस पाटील यांना रामनाथ विद्यालयात अभिवादन

औसा प्रतिनिधी 

आलमला ता.औसा येथील रामनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. एँड. एस. एस .पाटील यांची आज दि .29 जूलै शुक्रवार रोजी द्वितीय पुण्य तिथीनिमित्त संस्थेच्या वतीने त्यांना विद्यालयाच्या प्रांगणात अभिवादन करण्यात आले. प्रथम संस्थेचे सचिव प्रा.जी एम. धाराशिवे यांच्या हस्ते स्व. ऍड. एस एस पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. स्व.ऍड एस एस पाटील यांचे शैक्षणिक, सामाजिक, सहकार व धार्मिक कार्यातील योगदान अविस्मरणीय आहे त्यांच्याच प्रेरणेवर संस्थेची वाटचाल चालू राहणार आहे असे याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी संस्थेच्या प्रांगणामध्ये नारळाच्या वृक्षाचे मान्यवरांच्या हस्ते लागवड करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त प्राध्यापक जी एम धाराशिवे, एँड. उमेश पाटील, प्रभाकर कापसे, चनबसप्पा निलंगेकर, मन्मथआप्पा धाराशिवे, शिवाजी अंबुलगे, प्रा.नंदकुमार धाराशिवे, कैलास कापसे, कल्याण हुरदळे,शिवसांब हुरदळे, शिवशंकर धाराशिवे, शरण धाराशिवे, शिवकुमार पाटील, सर्व संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी आदरणीय स्व.एँड. एस एस पाटील उर्फ बाबा यांना अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments